ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

२१ पत्री - भाग ०१ : मंत्रोच्चारासह माहिती

याआधी आपण "गणेशोत्सव... एक आनंदसोहळा..." या पोस्टमध्ये दहा दिवसांचा गणेश उत्सव, त्यासाठी करण्यात येणारी पूर्वतयारी, गणेशाची प्रतिष्ठापना, उत्सवाचा श्रीगणेशा, साग्रसंगीत तयारी, गणरायास निरोप व उत्सवाची सांगता हे पहिले. (वाचण्यासाठी क्लिक करा)

गणेशउत्सवात भाद्रपदामधील शुक्ल चतुर्थीला - पहिल्या दिवशी गणेशास २१ प्रकारच्या पत्री म्हणजेच विविध वृक्षवल्लींची पाने मोठ्या भक्तीभावाने व श्रद्धेने अर्पण केली जातात. या २१ पत्री श्रीगणेशास त्यापुढे दिलेल्या मंत्रोच्चारासह वाहाव्यात : 

  (१)
पिंपळ
हेरम्बाय नमः। अश्‍वत्थपत्रं समर्पयामि।।
  (२)
देवदार
सुराग्रजाय नमः। देवदारुपत्रं समर्पयामि।।
  (३)
बेल
उमापुत्राय नम: । बिल्वपत्रं समर्पयामि ।।
 (४)
शमी
वक्रतुंडाय नमः । शमीपत्रं समर्पयामि ।।
 (५)
दूर्वा
गजमुखाय नम: । दूर्वापत्रं समर्पयामि।।
 (६)
धोतरा
हरसूनवे नम: । धत्तुरपत्रं समर्पयामि ।।
 (७)
तुळस
शूर्पकर्णाय नम: । तुलसीपत्रं समर्पयामि।।
 (८)
भृंगराज / माका
गणाधीशाय नम: ।भृंगराजपत्रं समर्पयामि ।।
 (९)
बोर
लंबोदराय नम: । बदरीपत्रं समर्पयामि।।
 (१०)
आघाडा
गुहाग्रजाय नम: । अपामार्गपत्रं समर्पयामि।।
 (११)
रुई/मांदार
विनायकाय नम: । मान्दारपुष्प समर्पयामि।।
 (१२)
अर्जुन/अर्जुनसादडा
कपिलाय नम:  । अर्जुनपत्रं समर्पयामि ।।
 (१३)
मरवा
भालचंद्राय नम:  । मरुबकं समर्पयामि ।।
 (१४)
केवडा/केतकी
सिद्धिविनायकाय नम:  । केतकीपत्रं समर्पयामि।।
 (१५)
अगस्ती/ हादगा
सर्वेश्वराय नम: । अगस्ती पत्रं समर्पयामि।।
 (१६)
कन्हेर/ करवीर
विकटाय नम:  । करवीरपत्रं समर्पयामि ।।
 (१७)
मालती/मधुमालती
सुमुखाय नम:। मालतीपत्रं समर्पयामि ।।
 (१८)
डोरली/बृहती
एकदंताय नम: बृहस्पतीपक्षं समर्पयामि ।।
 (१९)
डाळिंब
बटवे नमः । दाडिमीपत्रं समर्पयामि ।।
 (२०)
शंखपुष्पी/विष्णुकांत
विघ्नराजाय नमः। विष्णुकांत पत्रं समर्पयामि।।
 (२१)
जाई/चमेली
चतुर्भुजाय नमः । जातीपत्रं समर्पयामि ।।
 

श्रद्धा व भक्तीने या २१ पत्री गणेशास अर्पण करताना केवळ याच पत्रींचा समावेश का केला जातो? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे स्वाभाविकच आहे.

यासाठी पुढील पोस्टमध्ये या २१ पत्रीची ओळख आपण करून घेवूयात. या वृक्षवल्लरींचे खास वैशिष्ट्य, सर्वसाधारण वर्णन, औषधी व इतर उपयोग, त्यांचे धार्मिक महत्व जाणवणाऱ्या कथा / लोककथा पहिल्यास आपल्या वरील प्रश्नाचे नक्कीच समाधान होवू शकेल.
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters